Marathwada Sathi

या अभिनेत्रीने चक्क साडीघालून केला ‘व्यायाम’…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : व्यायाम करायचा म्हंटले की प्रत्येकालाच आरामदायी कपडे घालावे वाटतात.मात्र,एका अभिनेत्रीने तर चक्क साडी घालून व्यायाम केला आहे.अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हि सदैव काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. माझी आई काळुबाई मालिकेचा वाद असो किंवा खंडेरायाची खंडा तलवार उचलणे असो. तिने पोस्ट केलेल्या अनेक गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा होत असते.मात्र,यावेळी प्राजक्ता एका भन्नाट व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये साडी, नथ, आंबाडा या वेशभूषेत ती चक्क व्यायाम करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.तिचा हा व्हिडीओ चाहत्यांकडून प्राजक्ता चे कौतुक केले जात आहे.

प्राजक्ताचा हा व्हिडीओ बघण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा

https://www.instagram.com/p/CIx2jlPHgkf/?utm_source=ig_web_copy_link

Exit mobile version