Home बीड बीड शहरातील दोन दुकाने चोरट्यांनी फोडली

बीड शहरातील दोन दुकाने चोरट्यांनी फोडली

376
0

बीड l शहरातील बालेपीर भागातील बावळे कॉम्प्लेक्समधील एक मेडिकल दुकान आणि एक जनरल स्टोअर्सचे शटर उचकवून चोरट्यांनी आत प्रवेश करत दुकानातील रोकड लंपास केल्याची घटना आज घडली आहे. 
    बालेपीर भागातील बावळे कॉम्प्लेक्समधील सुयोग मेडिकल या दुकानाचे शटर तोडून त्या दुकानातील तीन हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. हे दुकान उघडण्यासाठी दुकान मालक सुनील आघाव आले असता त्यांच्या लक्षात ही घटना आली. त्यांच्या शेजारीच असलेली हरिओम जनरल स्टोअर्स नावाचे दुकानही अज्ञात चोरट्यांनी फोडले. या दुकानाचे मालक राजेंद्र घोलप दुकान उघडण्यासाठी आले असता दुकान फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. या दुकानातील ४ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here