Marathwada Sathi

हे आहेत रंगभूमी सेन्सॉर बोर्डाचे नवीन ‘अध्यक्ष’…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुन्हा रचना करण्यात आली असून अध्यक्षपदी श्रीरंग गोडबोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.श्रीरंग गोडबोले यांचे नाव रंगा गोडबोले म्हणून प्रसिद्ध आहे.गोडबोले यांच्या सोबतच सदस्यपदी अन्य २४ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रवीण तरडे, संपदा कुलकर्णी, लीना भागवत, मधुकर नेराळे, प्रदीप कबरे इत्यादींचा समावेश आहे.गोडबोले यांच्या अगोदर अरुण नलावडे हे रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष होते.

सतीश पावडे, भालचंद्र कुबल, डॉ. महेंद्र कदम, डॉ. वृंदा भरूचा, गौरी लोंढे, जयंत शेवतेकर, रमेश थोरात, शंकर रेगे, प्रवीण तरडे, महेश थोरवे पाटील, विजय चोरमारे, चंद्रकांत शिंदे, सुनील ढगे, संपदा कुलकर्णी, प्रभाकर दुपारे, दिलीप कोरके, किशोर आयलवर, लीना भागवत, अनिल दांडेकर, दिलीप ठाणेकर, सतीश लोटके, स्मिता भोगले, मधुकर नेराळे, प्रदीप कबरे हे २४ रंगभूमी सेन्सॉर बोर्डाचे नवनियुक्त सदस्य आहेत.

Exit mobile version