Marathwada Sathi

शेअर मार्केटमध्ये तीन दिवस शुकशुकाट राहणार

आज गुड प्रायडे… नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि BSE नं दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार आज बंद राहणार आहेत. याचाच अर्थ असा की, तुम्ही आज म्हणजेच, 7 एप्रिल 2023 रोजी शेअर बाजारातील कोणतेही व्यवहार करू शकणार नाही. शेअर बाजाराच्या एप्रिल हॉलिडेच्या यादीनुसार, गुड फ्रायडेच्या निमित्तानं बीएसई आणि एनएसई बंद राहणार आहेत. त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये बँकाही बंद राहणार आहेत.

BSE वर दिलेल्या माहितीनुसार, आज शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. तसेच, इक्विटी सेगमेंटमध्येही कोणतीही कृती दिसणार नाही. यासह, चलन डेरिव्हेटिव्ह सेगमेंट देखील सस्पेंडेड असेल. दुसरीकडे, काल (गुरुवारी) बाजार बंद झाल्यानंतर एखाद्यानं इक्विटी विकली किंवा विकत घेतली असेल, तर ती दुसऱ्या दिवशी पोर्टफोलिओमध्ये जोडली जाईल.कमोडीटी मार्केटही आज पूर्णपणे बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत येथेही कोणाताही व्यवहार होताना दिसणार नाही. मल्टी कमोडिटी मार्केट अंतर्गत सोन्या-चांदीच्या किमतींत कोणताही बदल होणार नाही.

शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या वर्षी एप्रिलमध्ये शेअर बाजार तीन दिवस बंद आहेत. गुड फ्रायडे म्हणजे, एप्रिलची दुसरी सुट्टी. यापूर्वी 4 एप्रिल रोजी महावीर जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद होतं आणि पुढील शेअर बाजाराची सुट्टी 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला असणार आहे.गुड फ्रायडेमुळे शुक्रवारी बाजार बंद असतो. अशातच पुढील 2 दिवस वीकेंड आहे. म्हणजेच, शनिवार आणि रविवारी असेल. त्यामुळे बाजारात खरेदी-विक्री होणार नाही. बाजारातील सुट्ट्यांबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट www.bseindia.com ला भेट देऊ शकता. डिपॉझिटरी डेटानुसार, फेब्रुवारी 2023 पर्यंत भारतात एकूण 11.25 कोटी खाती आहेत. कोरोनानंतर डिमॅट खात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

व्यवसायाच्या दृष्टीनं अल्पावधीत बाजारातील कामगिरी दिलासा देणारी ठरली. या कालावधीत निफ्टी आणि सेन्सेक्स सुमारे 3 टक्क्यांनी वाढले. आठवडाभर आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तेजी होती. दोन्ही इंडेक्स 3 टक्क्यांपर्यंत वाढले. टाटा मोटर्सचा शेअर गेल्या आठवड्यातील स्टार परफॉर्मर होता. 2023 मध्ये आतापर्यंत बाजाराची स्थिती वाईट होती. सेन्सेक्स जवळपास 1000 अंकांनी घसरला. आयझॉल, बेलापूर बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, हैदराबाद, आंध्र प्रदेश, इंफाळ, तेलंगणा, कानपूर, कोची, कोलकाता, उत्तर प्रदेश, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम यांसारख्या ठिकाणी गुड फ्रायडे 7 एप्रिल 2023 रोजी बँकांना सुट्टी असणार आहे.

Exit mobile version