Home क्रीडा एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे …..

एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे …..

133
0

मुंबई : भारताचा मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य राहणेच परत एकदा कौतुक केले जात आहे. शांत संयमी स्वभावाच्या अजिंक्यने अनेकदा चाहत्यांची मन जिंकली आहेत. आता परत त्याच्या एका कृतीने त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. ३२८ धावांचे लक्ष देत ऑस्ट्रेलियाने भारताला आव्हान दिले होते. त्याचा पाठलाग करत भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चाखत ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय प्राप्त केला. गाबाच्या मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवत इतिहास रचला. यानंतर सर्व स्तरातून भारतीय संघाचे कौतुक केले जात आहे. यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व केलेल्या अजिंक्य राहणेच मुंबई विमानतळावर जंगी स्वकगत करण्यात आले.

यावेळी विजय उत्सव साजरा करण्यासाठी अजिंक्यच्या घरी चाहत्यांनी कांगारूंची प्रतिक्रिया असलेला केक कापण्यास अजिंक्यला विनंती केली,पण त्याने ती नाकारली. कांगारू ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी असून तो केक कापण्यास नकार आपल्यातली खिलाडूवृत्ती आणि सामंजसपणा दाखवून दिला आहे. त्यामुळे त्याने परत एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here