Home अहमदनगर साईंच्या शिर्डीला बदनाम करणारी बाई चक्क प्रियकरासोबत सापडली ! शिर्डी पोलिसांचा धक्कादायक...

साईंच्या शिर्डीला बदनाम करणारी बाई चक्क प्रियकरासोबत सापडली ! शिर्डी पोलिसांचा धक्कादायक खुलासा साडेतीन वर्षांपूर्वी पासून महिला होती बेपत्ता

209
0

अहमदनगर
शिर्डीतील महिला मिसिंग प्रकरणात शिर्डी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. एक धक्कादायक प्रकार तब्बल तीन वर्षांनी समोर आला आहे. शिर्डीतील महिला मिसिंग प्रकरणात शिर्डी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. तीन वर्षांआधी दिप्ती सोनी नावाची महिला शिर्डीमधून बेपत्ता झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. यानंतर पती मनोज सोनीने तात्काळ मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे धाव घेत तक्रार नोंदवली होती. यावर उच्चन्यायालयाने पोलिस प्रशासनाची खरडपट्टी काढून चक्क मानव तस्करी बाबत चिंता व्यक्त केली होती. तर देशातील लाखो भक्तांसाठी तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीच्या नावलौकीकाला बाधा पोहचली होती व पोलीस प्रशासनाची नाचक्की झाली होती.
म्हणून शिर्डीतुन बेपत्ता झालेल्या या महिलेचा व तिच्या बेपत्ता होण्यामागील सत्य कारणाचा शोध लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने चांगलीच मेहनत घेतली अखेर पथकाला यश आलं आहे. या घटनेमुळे वस्तुस्थिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून महिलेच्या पतीला पोलिसांच्या माहितीनंतर धक्का बसला आहे. अतिरिक्त पोलीस अधिक्षक दीपाली काळे यांनी पत्रकार परिषद घेत यासंबंधि माहिती दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिप्ती सोनी या साडेतीन वर्षांआधी शिर्डीतून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पतीकडून नोंदवण्यात आली होती. पण दिप्ती ही तिच्या प्रियकरासोबत निघून गेल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. मुळची मध्य प्रदेशच्या इंदूरची दिप्ती सोनी साडेतीन वर्षांपूर्वी शिर्डीमधून बेपत्ता झाली होती.
यानंतर पोलीस पथकाकडून जागोजागी दिप्ती सोनीचा शोध घेण्यात आला होता. पण तिचा कुठेही पत्ता लागला नाही. यामुळे न्यायालयाने चक्क मानव तस्करी बाबत चिंता व्यक्त केली होती. पण तब्बल साडेतीन वर्षांनी मध्य प्रदेशच्या इंदूरमध्येच दीप्ती सापडली आहे. बेपत्ता पत्नी ही त्याच शहरात राहत असल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. प्रियकर ओमप्रकाश चंदेलसोबत दिप्ती निघून गेल्याचा शिर्डी पोलिसांनी खुलासा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहापुर्वीच दिप्ती आणि चंदेलचे प्रेमसंबध होते. पण इच्छेविरुद्ध तिचा विवाह मनोज सोनीसोबत झाला. पण प्रेमासाठी दिप्तीने पळून जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे मनोज सोनी यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आपली पत्नी बेपत्ता झाली म्हणून मनोज यांनी तिला शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. पण आजच्या धक्कादायक माहितीनंतर सोनी कुटुंबियांना मनस्ताप झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here