Home इतर मास्कचा वापर बंधनकारक;ख्रिसमससाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर…!

मास्कचा वापर बंधनकारक;ख्रिसमससाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर…!

82
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : सर्वत्र कोरोनाचे सावट असतांनाच आता ख्रिसमसच्या पार्शवभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील नागरिकांसाठी एक नवीन नियमावली जाहीर केली आहे. शिवाय त्यांनी हा सणही साधेपणानेच साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

ख्रिसमस साजरा करण्यासाठीचे नियम व अटी

  • स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये ५० हून जास्त जणांचा समावेश नसावा.
  • कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
  • फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासोबतच चर्च परिसराचे नियमितपणे सॅनिटायझेशन करणे अनिवार्य.
  • चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक.
  • चर्चमध्ये प्रभू येशुचे स्तुतीगीत गाण्यासाठी १० हून जास्त व्यक्तींचा सहभाग नसावा.
  • वापरण्यात येणारे माइक स्वच्छ असण्याची काळजी घ्यावी.
  • ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील मुलांनी चर्चमध्ये आणि घराबाहेर जाणे टाळावे.याऐवजी यंदा त्यांनी घरातच हा सण साजरा करावा.
  • कोणत्याही प्रकारे आकर्षित देखावे,आतिषबाजीचे आयोजन करु नये.
  • ३१ डिसेंबरला आभारप्रदर्शनासाठीचे मास आयोजित करतेवेळी वेळेचे निर्बंध पाळत मध्यरात्रीऐवजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास याचे आयोजन करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here