Home औरंगाबाद औरंगाबादेत पिस्टल विक्रीसाठी आलेल्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

औरंगाबादेत पिस्टल विक्रीसाठी आलेल्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

434
0

दोन पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त

हिनानगर भागात पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाची कारवाई

औरंगाबाद : गेल्या आठवडा भरात दोन गोळीबाराच्या घटना औरंगाबादेत घडल्याने शहर हादरले होते. शहरात पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांच्या पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने शनिवारी मध्यरात्री हिना नगर भागात सापळा रचून मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दोन पिस्टल,दोन दुचाकी, तीन मोबाईल असा तीन लाखाचा ऐवज जप्त केला आहे. शहरात गोळीबारीच्या घटना वाढत असताना ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित मधुकर वाघमारे (वय-22, रा.बोरगाव तारू, ता.भोकरदन, जि. जालना),बाळू दगडूबा खिल्लारे (वय-24 , रा.खिल्लारे टाकळी, ता.भोकरदन,जि. जालना), कपिल रमेश जोगदंड (वय-25, रा.न्यायनगर गल्ली, बुद्ध विहार जवळ, औरंगाबाद) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत. गेल्या आठवड्यात शहरात दोन ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या,देवा नगरीत पिस्टल च्या जोरावर हल्लेखोरांनी गोळीबार करीत एका बांधकाम व्यावसायिकांचे अपहरण केले होते,त्या नंतर वाहन खराब झाल्याने त्यांनी पायावर गोळी झडत पीडित व्यावसायिकाला सोडून पोबारा केला होता.या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसले होते.रिव्हलव्हर शहरात येतातच कोठून असा प्रश्न देखील समोर आला होता.त्यामुळे पोलीस प्रशासन देखील या शस्त्र तस्करांच्या शोधात होते. शनिवारी संध्याकाळी पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकातील साह्ययक निरीक्षक राहुल रोडे यांच्या पथकाला एका खबऱ्याने या बाबत माहिती दिली, की हिनानगर भागात काही तरुण शस्त्र विक्रीसाठी येणार आहे.

ही गोपनीय माहिती मिळताच आयुक्तांच्या विशेष पथकाने साध्या वेशात हिनानगर भागात रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सापळा रचला. तेथे (एम.एच.14 सीबी,5949) या दुचाकीवरून आरोपी अभिजित आणि बाळू आलेत तर (एम.एच.20 एफ.एफ.9856) या वर आरोपी कपिल तेथे आला तिघेही तेथे अंधारात एका खांबा जवळ उभे असतानाच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याचवेळी छापा टाकला मात्र तेथून कपिल ने दुचाकीवर धूम ठोकली आणि तो जालना शहराच्या दिशेने पळाला, हिनानगर भागातून अभिजित आणि बाडू या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एक पिस्टल मोबाईल काडतुसे पोलिसांनी जप्त केली. कपिलचा अनेक किलोमीटर पाठलाग केला मात्र त्याने जालनारोड वरील टोल नाक्यावर दुचाकी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर पोलिसांनी त्यास पकडले त्याच्या ताब्यातून दुसरी पिस्टल आणि दुचाकी जप्त केली. या तिघांच्या ताब्यातून दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, दोन दुचाकी, मोबाईल असा सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पुढील कारवाई साठी या तिन्ही आरोपिना एमआयडीसी सिडको पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.या आरोपी कडून शहरातील पिस्टल विक्री चे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here