Marathwada Sathi

नोकराने लंपास केले एक लाख वीस हजार..


मराठवाडा साथी न्यूज
पुणे: पुण्यामधील खडकी परिसरात घरकामास ठेवलेल्या नोकराने ज्येष्ठ महिलेच्या घरातून एक लाख वीस हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे.
आरोपी विनीतकुमार बिल्टू साफी (वय २०, सध्या रा. रॉयल टॉवर सोसायटी, औंध रस्ता, खडकी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ज्येष्ठ महिलेने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महिलेचे पती आजारी आहे. पतीच्या उपचारासाठी त्यांनी एक लाख वीस हजारांची रोकड कपाटात ठेवली होती. साफी त्यांच्याकडे घरकाम करतो. ज्येष्ठ महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून त्याने कपाटातील रोकड लांबविली होती. ज्येष्ठ महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात साफीने रोकड चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील अधिक तपास करत आहे.

Exit mobile version