Marathwada Sathi

या वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला …!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : नुकतेच नेटफ्लिक्सची वेबसीरिज ‘दिल्ली क्राईम’ हिला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२० मध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजसाठी सन्मानित करण्यात आले आहे.आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड मिळवणारी ‘दिल्ली क्राईम’ ही भारताची पहिलीच वेबसीरिज ठरली.

आता या वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती राजेश तैलंग यांनी दिली आहे.

इंडिया टुडेला बोलताना राजेश तैलंग म्हणाले एमी पुरस्कार जिंकल्यामुळे दिल्ली क्राइमच्या टिमचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे.त्यांनी सांगितले की, मी खूप उत्साही आहे, मला खूप कॉल येत आहेत. मला याबद्दल खूप चांगले वाटते. एमी पुरस्कार दिल्ली क्राइम वेब सीरिजला मिळाला हा आनंदाचा क्षण आहे आणि त्याचे श्रेय फक्त माझे किंवा दिल्ली क्राइम टीमचे नाही तर संपूर्ण देशातील लोकांचे आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचाही हा मोठा विजय आहे.

‘दिल्ली क्राईम’ ही वेबसीरिज २०१२ मधे घडलेल्या दिल्लीच्या निर्भया प्रकरणावर आधारित आहे.‘निर्भया’ या प्रकरणाने संपूर्ण देश हादरुन गेला होता. दिल्लीमध्ये झालेल्या या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर हि वेब सीरिज बनविण्यात आली होती, जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. सात एपिसोडच्या या वेब सीरिजमध्ये शेफाली शाह यांनी पोलीस उपायुक्त वर्तिका चतुर्वेदी ही प्रमुख भूमिका साकारली होती.यांच्या सोबतच राजेश तेलंग, आदिल हुसैन, रसिका दुग्गल, गोपाल दत्त तिवारी, जया भट्टाचार्य, अभिलाषा सिंह, विनोद शारावत, मृदुल शर्मा, अनुराग अरोरा, सिद्धार्थ भारद्वाज या कलाकारांचा समावेश आहे. ऋषी मेहता या वेबसीरिजचे लेखक-दिग्दर्शक आहेत.

Exit mobile version