Marathwada Sathi

२३ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात वाजणार शाळेची घंटा

मुंबई : कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.मात्र,जसे जसे अनलॉक होत आहे तश्या प्रत्येत अनलॉक च्या वेगवेगळ्या टप्यावर हळू हळू अर्थव्यवस्था सुरळीत होत चालली आहे. मात्र, महाविद्यालये आणि शाळा अजूनही बंद च होती.ऑनलाईन पद्धतीने जरी शिक्षण चालू असेल तरी शाळा आणि महाविद्यालये पुन्हा कधी सुरु होणार यावर प्रश्नचिन्हच होत पण आता शाळा कधी सुरु होतील या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

राज्यात शाऴा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. २३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात एसओपी तयार करण्यात आला असून त्याबाबत केवळ मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी मिळणं बाकी आहे.

एसओपी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर इयत्ता १० वी , १२ वीच्या परीक्षा मे महिन्यातच होतील अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी देखील घेतली जाणार आहे. यासंदर्भात पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात एसओपी देखील तयार करण्यात आला आहे. कशा पद्धतीने शाळा सुरू करण्याचे नियोजन असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

Exit mobile version