Home औरंगाबाद धावती कार पेटली, सुदैवाने जीवित हानी नाही; घटना कॅमेरात कैद

धावती कार पेटली, सुदैवाने जीवित हानी नाही; घटना कॅमेरात कैद

4
0

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । भरधाव वेगाने जाणारी धावती कार वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव चौफुलीजवळ अचानक पेटल्याने पोलीस व अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आग विझवली. मात्र सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मंगळवारी (20) रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
नक्षत्रवाडी येथील सुशील बोर्डे हे तिसगाव येथे एका नातेवाईकाला सोडून घरी जात असताना त्यांची कार (एम एच 20,ईजे- 4826) च्या बोनट मधून अचानक धूर निघाला. त्यामुळे ते लगेच कारच्या बाहेर पडले. त्यानंतर कार पेटताच बोर्डे यांनी 100 नंबर वरून घटनेची माहिती पोलिसांना दिल्याने वाळुज एम आय डी सी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रीती फड, मोहन पाटील तसेच अग्निशमन दलाचे बी जी काळे, एस एफ वासनकर, एस आर गायकवाड, एन एस कुमावत, व्ही एस खेडकर,एम डी पाचनकर, ए एम हातवडे यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मंगळवारी  रोजी दीड वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here