Marathwada Sathi

अमित शहा यांचा फोटो हटविण्याचे कळाले कारण

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : ट्विटरवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रोफाईल फोटो अचानक गायब झाला. यानंतर ट्विटरने तातडीने दुरुस्ती करुन फोटो पुन्हा अपडेट केला. मात्र फोटो का हटविण्यात आला याचे खरे कारण आता ट्विटर ने सांगितले आहे.

अनावधनाने ही चूक झाल्याची प्रतिक्रिया ट्विटरने दिली आहे. ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे की, “काही तांत्रिक अडचणींमुळे ग्लोबल कॉपीराईट पॉलिसी अंतर्गत ट्विटर तात्पुरते लॉक करावे लागले होते.त्या सर्व गोष्टी तातडीने दुरुस्त केल्या असून अकाऊंट आता पूर्ववत झाले आहे.”

‘कॉपीराइट होल्डरच्या रिपोर्ट’नुसार अमित शाह यांचा फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन काढला होता.अमित शाह यांच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक केल्यावर ब्लँक पेजसह “मीडिया नॉट डिस्प्लेड. कॉपीराईट होल्डरच्या अहवालानुसार हा फोटो हटवण्यात आला आहे.असे सांगितल्या जात होते. मात्र यानंतर अमित शाह यांचा फोटो पुन्हा लावण्यात आला. परंतु ट्विटरने याबाबत आणखी माहिती शेअर केलेली नाही.”ट्विटरवर त्यांचे २३.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Exit mobile version