Marathwada Sathi

पोलिसांना खबऱ्यांसाठीच्या ‘सिक्रेट फंड’ चाही झाला वांदा

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद :
पोलिसांच्या ‘इन्व्हेस्टीगेशन’ फंडाचा फटका जसा तपासी अंमलदाराला बसतो आहे. तशाच पद्धतीने पोलिसांचे खबरे विकसीत करण्याठीचा ‘सिक्रेट फंड’चाही तसा काहीसा वांदा झाला आहे.

खबऱ्यांच्या नेटवर्कवर ठरते यश
पोलीस अधिकाऱ्यांच्या तपासाचे किंवा त्याच्या यशातील महत्वाचा भाग हा खबरे ज्याचे जास्त त्याला मिळतो. या खबऱ्यांसाठी पोलिसांना खास ‘िसक्रेट फंड’ असतो. त्या फंडातून प्रत्येक पोलीस अधिकारी आपले खबऱ्यांचे नेटवर्क अधिक सुदृढ आणि सक्षम करावे लागते. पण या फंडाचा वांदा झाला आहे.

५ वर्षांपासून मिळाला नाही फंड
गेल्या ५ वर्षात औरंगाबाद आयुक्तालयातील एकाही पोलीस अधिकाऱ्याला हा फंड मिळालेला नाही. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना तपासासाठी स्वत:ची खबऱ्यांची जी यंत्रणा राबवावी लागते. त्यासाठी स्वत:च्या खिश्याला झळ बसते आहे. हा फंड ५ वर्षात मिळालाच नाही, असे नाही. पण आता कधी आणि गेला कधी याचा पत्ताच अधिकाऱ्यांनाच लागला नाही.

खबऱ्यांचे नेटवर्कच नाही
पोलीस आयुक्तालयात स्थानिक जे पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी आहेत. त्यांचे वैयक्तीक पातळीवर खबऱ्यांचे नेटवर्क आहे. त्याचाच त्यांना फायदा होतो. आता पूर्वीसारखे खबऱ्यांचे जाळे कोणताही पोलीस अधिकारी निर्माण करीत नाही. त्याला त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही ठराविक लोक जे माहिती देतात, त्यांचीच माहिती असते. त्यामुळे तसे नेटवर्क आता कुठेही अस्तित्वातच नाही.

Exit mobile version