Marathwada Sathi

फोन चार्जिंगला लावला आणि…!

मराठवाडा साथी न्यूज

आंघोळ करतांना फोनचा वापर करणे किती महागात पडू शकते याबद्दल नुकतीच प्रचिती झाली आहे. रशियातील एक महिला मोबाईल फोन चार्जिंगला लावून बाथटब मध्ये आंघोळ करत होती. अचानक फोन बाथटब मध्ये पडल्याने करंट लागून या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रशियातील अर्खंग्लेस्क येथील आहे. ओलेस्या सेमेनोवा असे मृत महिलेचे नाव आहे. तिने तिचा आयफोन चार्जिंगला लावला आणि फोन अचानक बाथटबमध्ये पडला. विजेचा तीव्र झटका बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

Exit mobile version