Marathwada Sathi

रुग्नाच्या मृत्यूनंतरही शरीरात कोरोना जीवंत!

बंगळुरु । कोरोनासंदर्भात बाबतीत आश्चर्यजनक बाब समोर आली आहे. कर्नाटकातील ६२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यूनंतर जेव्हा मृताची ऑटोप्सी केली तेव्हा फुफ्फुस थांबले होते. मात्र, १८ तासानंतर नाक आणि मयताच्या गळ्याद्वारे स्वॅब घेऊन त्याची चाचणी केली तेव्हा त्यात कोरोना विषाणू जीवंत असल्याने आढळून आले.
ऑटोप्सी करणाऱ्या ऑक्सफोर्ड मेडिकल काॅलेजचे डॉ. दिनेश रॉव यांनी सांगितले की, रुग्णाचे फुफ्फुस अतिशय कठोर झाले होते. फुफ्फूसातील एयर सॅक पूर्णपणे नष्ट झाली होती. रक्तवाहिण्यातील रक्तही गोठले होते. शरीरातील अवयवांची अतिशय वाईट अवस्था होवूनही रुग्न दगावल्यानंतरही शरीरातील कोरोना मात्र सक्रीय आढळला.

Exit mobile version