Marathwada Sathi

करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय, पण काळजीचं कारण नाही

नवी दिल्लीः देशासह राज्यातही करोना रुग्णसंख्येचा आलेख वाढतोय. महाराष्ट्रात शुक्रवारी ९२६ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात करोनाचे ४४८७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यावर्षात करोना झपाट्याने पसरत आहे. रुग्णांची वाढत जाणारी संख्या चिंता निर्माण करणारी असली तरी ता तज्ज्ञांनी करोनाबाबत दिलासादाक माहिती दिली आहे.

करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी आता काही चिंताजनक असे आढळून आलेले नाही त्यामुळं काळजी करण्याचे काही कारण नाही. चाचण्या वाढवल्या असल्यामुळं नवीन रुग्ण आढळून येत आहेत. यावेळी H3N2मुळं नागरिकांचा खोकला बराच काळ सुरु आहे. त्यामुळं चाचण्या केल्या जात आहे. ज्या लोकांची चाचणी होत आहे त्यामुळं जेव्हा रुग्णांची चाचणी केली जाते तेव्हा त्यांच्यापैकी काहींना करोनाची लक्षणेही आढळत आहेत. सध्या जो विषाणू वेगाने पसरत आहे तो ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे असून त्याला XBB.1.16 असे नाव देण्यात आले आहे. मात्र, रुग्णांमध्ये त्याचा संसर्ग गंभीर नसल्याचे दिसून येतेय, अशी माहिती डॉ. नंदिनी शर्मा यांनी म्हटलं आहे.

देशात सध्या अवकाळी पावसाचे सावट आहे कधी उन कधी पाऊस अशा वातावरणामुळं श्वसनासंबंधित आजार वाढतात. इन्फ्लूएंजा, स्वाइन फ्लू आणि करोना या तिन्ही आजारामुळं धोका वाढला आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळं संसर्ग वाढतोय. तसंच, करोनाच्या विषाणुमध्ये सातत्याने बदल होत आहेत. रुग्णांमध्येही संसर्गाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती आहे. २०१०मध्ये जेव्हा स्वाइन फ्लूचा फैलाव झाला होता तेव्हा त्याची धास्तीही तितकीच होती. मात्र कालांतराने स्वाइन फ्लूचे संसर्गही कमी झाला, असंही नंदिनी शर्मा यांनी म्हटलं आहे.

येणाऱ्या काळात करोनादेखील स्वाइन फ्लूसारखा सेटल होऊ शकतो. ज्याची रोगप्रतिकार शक्ती कमी असेल त्यांना त्याचा त्रास जाणवू शकतो. जे इतर व्याधींनी ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी धोका जास्त आहे. चाचण्या वाढवल्यामुळं रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं सध्या चिंता करण्याची कोणतीही बाब नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Exit mobile version