Home इतर आईनेच काढला मुलीचा काटा…!

आईनेच काढला मुलीचा काटा…!

361
0

मराठवाडा साथी न्यूज

बालासोर :आईनेच काही लोकांना ५० हजारांची सुपारी देत स्वतःच्याच मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मृत मुलगी अवैध दारू व्यवसायात गुंतली होती.तिला समजावून सांगितल्यानंतरही तिने आपल्या आईचं ऐकले नाही.त्यामुळे आईने कट रचून चक्क आपल्या मुलीची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत मुलीचे नाव शिबानी नायक असून लग्न झाले असले तरी ती आपल्या आई वडिलांसोबतच राहत होती.काही दिवसांपासून ती दारूच्या अवैध व्यवसायात गुंतली होती.तिला आईने अनेकदा समजावून देखील तिने आईचे ऐकले नाही.शेवटी कंटाळून आईने मुलीच्या हत्येचा कट रचला.

दरम्यान,या प्रकरणातील मुख्य आरोपी आईचे नाव सुकुरी गिरी असून ती ओडिशातल्या बालासोर जिल्ह्यातील रहिवासी आहे.तिने प्रमोद जेना(वय ३२)आणि अन्य दोन साथीदारांना आपल्याच मुलीची हत्या करण्याकरीता ५० हजारांची सुपारी दिली.या प्रकरणी पोलीसांनी मुख्य आरोपी सुकुरी गिरी सोबतच प्रमोद जेनालाही अटक केली आहे.दरम्यान,अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे,अशी माहिती बालासोर उप विभागीय पोलीस अधिकारी परवश पाल यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here