Marathwada Sathi

भरधाव पिकअपने दुचाकीला उडवले

बीड / रात्री आपले कर्तव्य बजावून सकाळी घरी परतणार्‍या महामार्ग पोलिसांच्या दुचाकीला भरधाव वेगात असलेल्या पिकअपने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी रामनगर येथील बायपासवर घडली.

पाडळसिंगी येथील टोल नाक्यावर रात्री तांदळे व राख हे दोघे कर्तव्यावर होते. सकाळी ड्युटी करून ते दुचाकी क्र. एम.एच. २३ ए.झेड. ६६५८ ने बीडकडे येत असताना रामनगर येथील बायपास चौकात त्यांच्या दुचाकीला पिकअप क्र. जी.जे. २७ एक्स-६९४६ ने जोराची धडक दिली. या अपघातात तांदळे व राख हे दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Exit mobile version