मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भावनिक राजकारण खेळते असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर आता शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांनी वक्तव्य केलं आहे.

” संभाजीनगर ” हा मुद्दा आमच्यासाठी भावनिक नसून, तो अस्मितेचा मुद्दा असल्याने नामंतर झाले पाहिजे. असे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले आहे. राज्य शासनाने गुंठेवारी नियमितीकरण कायदा मंजूर केल्यानंतर ठाकरे सरकारचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेनेतर्फे जल्लोष करण्यात आला.जिल्ह्यात भाजपची सत्ता असतानाही भाजपने कोणतेही कामे केली नाहीत. शिवसेनेने वेळोवेळी गुंठेवारी नियमित करण्यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.