Marathwada Sathi

मागील ६ महिन्यातील देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

देशात गेल्या २४ तासांत ३,०१६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, जी जवळपास सहा महिन्यांतील सर्वाधिक आहे. यासोबतच कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १३,५०९ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे, रोजाचा पॉझिटीव्हीटी रेट हा दर २.७३% वर वाढला आहे.
भारतात गेल्या २४ तासांत झालेल्यी ३,०१६ नवीन कोविड रुग्णांची वाढ कालपासून ४० टक्क्यांनी जास्त आहे. तसेच कोरोनाचा रोजचा पॉझिटीव्हीटी रेट २.७ टक्के आणि आठवड्याचा पॉझिटीव्हीटी रेट १.७१ टक्के नोंदविला गेला आहे.
14 मृत्यूंसह देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५,३०,८६२ वर पोहोचली आहे. २४ तासांच्या कालावधीत महाराष्ट्रात तीन, दिल्लीतील दोन आणि हिमाचल प्रदेशात एक आणि केरळमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, सक्रिय प्रकरणांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी ०.०३टक्के रुग्ण आहेत, तर राष्ट्रीय कोविड-19 रिकव्हरी रेट ९८.७८ टक्के नोंदवला गेला आहे.या आठवड्यात कोविड प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ आढळून आल्यानंतर अनेक राज्यांनी आपत्कालीन बैठका घेतल्या जात आहेत. दिल्ली, जिथे १६जानेवारी रोजी संसर्गाची संख्या शुन्यावर आली होती, तेथे गेल्या २४ तासात ३०० प्रकरणे नोंदली गेली.मुंबई, पुणे, ठाणे आणि सांगली यांसारख्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही कोविड प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

Exit mobile version