Marathwada Sathi

“सरकारला शेतकऱ्यांना चिरडून टाकायचंय, दडपशाही करायचीये”

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : “सरकारने एकप्रकारची दडपशाही सुरू केलेली आहे. लाल किल्ल्यावर शेतकरी घुसले असं म्हणत आहेत. ते खरोखर शेतकरी होते? की कुणीतरी फूस लावून, जे आता फोटो आलेले आहेत, पंतप्रधानांबरोबर किंवा भाजपाच्या नेत्यांबरोबर जे कुणी सिद्धू वैगरे लोकं आहेत. ते कोण आहेत? कुणाचे आहेत? त्याचा तपास अगोदर करा. ते कुठं फरार झालेले आहेत. पण सरकारला आता यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचं आहे. दडपशाही करायची आहे आणि त्याचाच एक कारस्थानाचा भाग म्हणून आंदोलनात फूट पाडून त्यातील एक गट जो भाजपाच्या नेतृत्वाखाली आतमध्ये घुसला होता ते लाल किल्ल्यावर गेले. त्यांनी गदारोळ निर्माण केला आणि आज जे सगळं चित्र निर्माण झालं आहे, परत की आंदोलनात फूट पडली. काही नेत्यांवरती गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांना पाहून घेऊची भाषा पोलिसांकडून सुरू आहे. ठीक आहे, करून घ्या. संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. पहिल्या दिवसांपासून या सरकारला सर्व प्रश्नांचा उत्तर द्यावी लागतील.”

Exit mobile version