Marathwada Sathi

काश्मीर मध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी , पर्यटकांची होतेय गर्दी

जम्मू -काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षातील थंडीच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली.बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे.पटनी टॉप आणि शिमला येथे देखील बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे
मोठ्या प्रमाणावरील बर्फवृष्टीमुळे काश्मीर निसर्गसौंदर्याने नटला आहे.
हिमवृष्टीमुळे उत्तर भारतामध्ये थंडीची लाट पसरली आहे.त्याचबरोबर पर्यटकांचाही येथे ओघ वाढत आहे. या पहिल्या बर्फवृष्टीचा आनंद पर्यटक लुटत आहेत.
पर्यटकांनी या बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद लुटला.यामुळे पर्वत रागांमधील या परिसराचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे.

Exit mobile version