Marathwada Sathi

लॉकडाउन शिथिलतेनंतर लायन्स ब्लड बँकेची पहिली बैठक संपन्न

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : येथील लायन्स बँक येथे कोरोना प्रादुर्भावाने करण्यात आलेल्या लॉकडाउन शिथिलथेनंतर आज प्रथम बैठक घेण्यात आली. यावेळी मागील सहा महिन्यातील ब्लड बँकेच्या कार्यावर अवलोकन करण्यात आले.

कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आपत्कालीन स्थितीत सेवा देणारे रक्तपुरवठा करणाऱ्या ब्लड बॅंकेनादेखील अनेक समस्यांचा सामना करावा लागला. लायन्स ब्लड बँकेने कोरोना काळात केलेल्या कार्याचे अवलोकन करण्यासाठी बैठक घेण्यात आली.

दर महिन्याला पाचशेहून अधिक कलेक्शन करणारे लायन्स ब्लड बँकेने कोरोना काळात कलेक्शन कमी झाले. रुग्णांना तत्पर सेवा देणे लोकडाऊनमध्ये अवघड जात असल्याने, रक्त संकलन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सोसायटीमध्ये जाऊन, जुन्या रक्तदात्याना संपर्क करून संकलन करण्यात आले. सोशल डिस्टंसिंग आणि लोकडाऊनचे नियम पाळत मागील काही महिन्यात तीनशेहून अधिक कलेक्शन केले.

वेगवेगळ्या गरजू रुग्णांना रक्त देताना २८८ पीआरसी, २२३ पेल्टलेस व तीनशे प्लास्मा आपत्कालीन स्थितीत उपलब्ध करून दिल्याचे तनसुख झांबड यांनी सांगितले. त्याचबरोबर ८९ बॅग गरजूंना सूट म्हणून तर आर्थिकदृष्ट्या असक्षम असणाऱ्यांना अशा पाच बॅग मोफत देण्यात आल्या आहेत. या बैठकीत अध्यक्ष उषा नागपाल, तनसुख झांबड, उपाध्यक्ष सत्यनारायण अग्रवाल, भगवान काबरा, डॉ सुरेंद्र राठी, डॉ प्रकाश पाटणी, अजित छाजेड, डॉ पानसे डॉ रियाज फाबरे तसेच लायन्स ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Exit mobile version