Marathwada Sathi

पहिले ‘हिंदकेसरी’ श्रीपती खंचनाळे यांचे निधन…!

मराठवाडा साथी न्यूज

कोल्हापूर : देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.खंचनाळे यांनी राज्यातील अनेक मल्ल घडविले आहेत.त्यांच्या निधनामुळे कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.खंचनाळे गेले काही दिवस आजारी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी कोल्हापूरमधील एका सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.वृध्दापकाळ आणि कंबरदुखी सोबतच इतर काही व्याधीमुळे त्यांची प्रकृती अनेक दिवसांपासून चिंताजनक बनली होती.शेवटी आज सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला.त्यांच्या पश्चात त्यांच्या पश्चात पत्नी शांता, मुले सत्यजित, रोहित आणि विवाहित मुलगी पौर्णिमा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या विषयी थोडक्यात

श्रीपती खंचनाळे यांनी महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियन सारख्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. हिंदकेसरी जिंकत कुस्ती क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळवत महाराष्ट्राची मान त्यांनी उंचावली होती.फक्त एव्हडेच नाही तर खंचनाळे यांचे राज्यातील अनेक मल्ल घडवण्यात मोठे योगदान आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नामांकित मल्ल म्हणून परिचीत झालेले खंचनाळे नंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले.नवी दिल्ली येथे ३ मे १९५९ ला झालेल्या लढतीत प्रतिस्पर्धी प्रसिद्ध मल्ल रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंग यांना हरवत ते ‘हिंदकेसरी’ झाले.हिंदकेसरी झाल्यानंतर त्यांनी कराड येथे झालेल्या लढतीत अनंत शिरगांवकर यांना हरवून ते ‘महाराष्ट्र केसरी’ झाले.

खंचनाळे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहेत की, कुस्ती ही लढवय्या महाराष्ट्राची शान आहे. मातीतल्या या खेळावर महाराष्ट्राचे नाव कोरले ते पहिला हिंदकेसरी किताब पटकावून श्रीपती खंचनाळे यांनी. त्यांच्या निधनामुळे अनेक हिंदकेसरींचे आणि होतकरू कुस्तीगीर पैलवानांचे वस्ताद म्हणजे मार्गदर्शक छत्र हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदकेसरी ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांना वाहिली आहे.

Exit mobile version