Home राजकीय काल वाया गेलेल्या मुलाचा बाप बोलत होता – नितेश राणे

काल वाया गेलेल्या मुलाचा बाप बोलत होता – नितेश राणे

7
0

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना राणे पितापुत्रांवर टीका केली होती. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले की, काल वाया गेलेल्या मुलाचा बाप बोलत होता. स्वतःच्या मुलाचे कर्तृत्व लपवण्यासाठी हे सर्व चालले आहे. हे म्हणजे महाराष्ट्र आणि आम्ही बाहेरून आलोय का? पोलिसांबद्दल आम्हाला पण आदर आहे. यांनी आम्हाला शिकवू नये, असेही नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे म्हणाले की, बाळासाहेबांनी अंगणात तुळशी वृंदावनच लावले होते. पण यांचा श्रावणबाळ जिथे संध्याकाळी बसतो त्या डिनोच्या अंगणात तुळशी होती की गांज्याची शेती आहे ते तपासून पहा, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, सीबीआयला निःपक्षपातीने चौकशी का करू दिले जात नाहीये, काय झाले होते दिशा सालियानच्या घरी, CDR रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज का समोर येऊ देत नाहीत? समित ठक्कर, साहिल चौधरी यांना अटक का केले आहे. हे घाबरतात म्हणून? असा सवाल देखील नितेश राणेंनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here