Marathwada Sathi

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेत्याचे वडील होते शिवसेना शाखाप्रमुख, २५ वर्षांनंतर शेअर केला ‘तो’ फोटो

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. याच कार्यक्रमातील अनेक कलाकार हे कायमच चर्चेत असतात. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रसाद सगळ्यांना खळखळवून हसवतो. प्रसादने नुकंतच एक भावूक पोस्ट केली आहे.

प्रसाद खांडेकर हा सध्या कुर्रर्रर्र या नाटकाच्या निमित्ताने अमेरिका दौऱ्यावर आहे. नुकतंच त्याने त्याचे वडील महादेव खांडेकर यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. प्रसाद खांडेकरचे वडील महादेव खांडेकर यांचे २५ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या आठवणीत त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

प्रसाद खांडेकरची पोस्ट

“बाबा तुम्हाला जाऊन २५ वर्ष झाली ….जो काही मला १४ वर्षांचा तुमचा सहवास लाभला आणि त्यात तुमच्याकडून जे काही बाळकडू घेतलं ….त्या तुम्ही दाखवलेल्या वाटेवर अजून ही चालतो आहे ….थोडा धडपडतोय पुन्हा उभा राहतोय ….घरच्यांना सांभाळतोय….

मित्रांना जपतोय …..कला जोपासतोय जमेल तशी समाजसेवा करतोय …..पण प्रत्येक क्षणाला तुमची आठवण आल्या शिवाय राहत नाही ….मला माहिती आहे जिथे असाल तिथून लक्ष ठेवून आहात .. म्हणूनच योग्य दिशेने चाललोय आम्ही सगळे…बाबा आहात तिथे खुष राहा आणि कायम आम्हा सगळ्यांवर आशीर्वाद ठेवा. खूप खूप प्रेम आणि घट्ट घट्ट मिठी, लव्ह यू”, असे त्याने यात म्हटले आहे.

दरम्यान प्रसाद खांडेकरचे वडील हे शिवसेनेच्या बोरिवलीतील शाखेचे शाखाप्रमुख होते. त्याने या पोस्टबरोबर काही फोटोही शेअर केले आहेत. त्यातील एका त्यांचे कुटुंब पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोत प्रसादने एक कार्ड शेअर केले आहे.

Exit mobile version