Home मनोरंजन ” Shona शोना ” चे इंग्लिश व्हर्जन होतेय फेमस

” Shona शोना ” चे इंग्लिश व्हर्जन होतेय फेमस

53
0

नवी दिल्ली: शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांचे ‘शोना शोना’ गाणे खूप व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या गाण्याला सर्वाधिक पसंत केले जात आहे. युट्युबवर याला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे टोनी कक्कड़ आणि नेहा कक्कड़ यांनी गायले होते. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही खूप भावली होती. त्या दोघांच्या जोडीमुळे हे गाणे अधिकच सुपरहिट झाले.

एम्मा हेस्टर्स च्या इंग्लिश व्हर्जनची धूम :
आता या गाण्याचे इंग्रजी व्हर्जन आले आहे.गायिका एम्मा हेस्टर्स हिने इंग्लिश व्हर्जन केले आहे. ज्याला सर्वाधिक पसंत केले जात आहे. एम्मा हेस्टर्स ही एक युट्यूबर आहे. यापूर्वी तिने हार्डी संधूच्या “तितलिया ” गाण्याचेही इंग्लिश व्हर्जन गेले होते.

इंग्लिश व्हर्जनला २ लाख व्ह्यूज :
आतापर्यंत या गाण्याला २ लाखांहून अधिक लोकांनी पहिले आहे. एम्मा हिस्टच्या या गाण्यावर बऱ्याच कंमेंट येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here