Home क्राइम माणुसकीचा ‘अंत’…?

माणुसकीचा ‘अंत’…?

72
0

मराठवाडा साथी न्यूज

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील बदायूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.एका ५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराकरून तिची क्रूरतेणे हत्या करण्यात आली आहे.मृत महिला आंगनवाडी सहाय्यक म्हणून काम करत होती.धक्कादायक म्हणजे पीडित महिलेच्या शरीरात खासगी अंगांत लोखंडी रॉड घुसवल्याचेही समोर आले आहे.काही दिवसांपूर्वी (३ जाने.)रोजी सायंकाळी ही महिला मंदिरात पूजेसाठी गेली असता मंदिरातील पुजाऱ्यासोबत आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला.याच रात्री त्यांनी आपल्या गाडीतून पीडित महिलेचा रक्तबंबाळ मृतदेह तिच्या घराबाहेर फेकून आरोपी तिथून पसार झाले होते.

या प्रकरणी कुटुंबीयांकडून जेव्हा पोलिसांना माहिती देण्यात आली तेव्हा पोलिसांनी मात्र पीडित कुटुंबाची दिशाभूल करत त्यांना पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावल्याचा आरोप केला जातोय.या घटनेची माहिती मिळाल्यानंतरही पोलिसांनी (४ जाने.)रोजी मृत महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न ४८ तासांनंतर केल्याचे समोर आले आहे.शवविच्छेदनात आलेल्या अहवालानुसार महिलेच्या खासगी अंगावर गंभीर जखमांच्या खुणा आढळल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आहे.तसेच खासगी अंगात लोखंडी सळी घुसवण्याचाही क्रूरपणा यातून समोर आला.

दरम्यान,या प्रकरणात पोलिसांनी महंत सत्यनारायण, सहाय्यक वेदराम आणि चालक जसपाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.यांपैकी एका आरोपीला अटक करण्यात असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here