Marathwada Sathi

बादशाहाला मिळाली ‘विनम्रतेने’ ‘मन्नत’

मुंबई:शाहरुख खानच्या मोहब्बतें या चित्रपटाला मंगळवारी 20 वर्षे पूर्ण झाली. त्यावर शाहरुख खानने आनंद व्यक्त केला आणि या चित्रपटातील प्रसिध्द झालेल्या आयकॉनिक लाईनचे ट्वीट केले, “प्यार ऐसे होता है… 20 वर्षानंतर ही ओळ मी पु्न्हा म्हणतोय. एका लहानशा स्टुडियोत आदी सोबत या चित्रपटाचे रेकॉर्डिंग केले होते आणि यशजींना ते पसंत पडले होते.”

अजून 50 वर्ष चित्रपटात काम करणार

एका चाहत्याने विचारले की, ‘सुहाना, आर्यन आणि अबराम तुला डॅड म्हणतात की डॅडी?’ यावर शाहरुखने सांगितले की, ‘ते मला ‘पापा’ असे म्हणतात. एका चाहत्याने विचारले की, ‘सर माझ्या आयुष्यात आता 50 वर्षे राहिली आहेत. तोपर्यंत तुम्ही नव्या चित्रपटाची घोषणा करणार का?’ त्यावर शाहरुखने म्हटले की, ‘चित्रपटात काम करता करता माझ्या आयुष्याचा 50 वर्षाहून अधिक काळ गेला. यापुढेही मी हेच करत राहणार आहे आणि पुढच्या 50 वर्षात तुम्ही कृपा करुन ती बघा.’

बॉलिवूडचा बादशहा अशी ओळअजून 50 वर्ष चित्रपटात काम करणारख असलेला शाहरुख खान त्याच्या अनोख्या अंदाजासाठी प्रसिध्द आहे. त्याचा चाहता वर्ग भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आहे. त्याच्या प्रत्येक कृतीला त्याच्या चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. असाच एक अनुभव नुकताच आलाय. शाहरुख खानने ट्विटरवर त्याच्या चाहत्यांसाठी ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन ठेवले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून शाहरुखनेही त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

एका चाहत्याने शाहरुखला विचारले की, ‘क्वॉरंटाईनमध्ये काय केलंस? त्यावर शाहरुखने उत्तर दिले की ‘चित्रपट पाहण्यात’ गेले. त्यावेळी शाहरुखने चाहत्यांना त्याच्या दिनक्रमाविषयी सुध्दा माहिती दिली. त्याने सांगितले की, ‘त्याचा बराच काळ हा मुलांसोबत वर्कआऊट करण्यात आणि क्रिकेट खेळण्यात जातो. यावेळी शाहरुखने त्याच्या चाहत्यांना सांगितले की, ‘त्याने लॉकडाऊनच्या काळात कुटुंबासोबत वेळ घालवला. “तू या काळात जेवण बनवायला शिकलास का?” या एका चाहत्याच्या प्रश्नावर त्याने सांगितले की, “प्रामाणिकपणे मी सांगतो की, आजही जेवणात मीठ किती टाकायचे हे मला समजत नाही.”

‘मन्नत’ विकणार का?

एका चाहत्याने शाहरुखला त्याच्या मन्नत बंगल्याच्या विक्रीबाबत एक प्रश्न विचारला. चाहत्याने विचारले की, “भाई मन्नत विकणार आहे का?” त्यावर शाहरुखने आपल्या हटके अंदाजात उत्तर दिले. तो म्हणाला की, ‘मन्नत विकली जात नाही, ती विनम्रतेने मागितली जाते. हे लक्षात ठेवलंस तर आयुष्यात खूप काही मिळवशील.’

Exit mobile version