Home मुंबई बिचाऱ्या शिवसेनेवर संगतीचा परिणाम…!

बिचाऱ्या शिवसेनेवर संगतीचा परिणाम…!

552
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : “शिवसेना भविष्यात मुस्लिम समाजाचादेखील मेळावा घेऊ शकतात. कारण त्यांची बिचाऱ्यांची भूमिका बदलली. हा संगतीचा परिणाम आहे”,असे विधान करत रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलाच टोला दिला आहे.मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चेबांधनीला सुरुवात केली असून शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी गुजराती बांधवाचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. मात्र, या मेळाव्यावरुन रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीका केली जात आहे

दरम्यान,औरंगाबादच्या नामांतराच्या विषयावर बोलतांना दानवे असेही म्हणाले की ,“१९९५ साली भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे सरकार असताना विधीमंडळात औरंगाबाद शहराचे नाव संभीजीनगर होईल,असा ठराव झाला होता.तेव्हा औरंगाबाद चे नाव संभाजीनगर व्हावे अशी भाजपसोबत शिवसेनेची स्पष्ट भूमिका होती. शिवसेनेने त्या भूमिकेपासून दूर जाऊ नये. संभाजीनगर नावाला आमचे समर्थन आहे. संभाजी महाराजांच्या नावाला काँग्रेस विरोध करत असेल तर आता शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here