Marathwada Sathi

महिलेशी तसे संबध ठेवणारा डॉक्टर सीईओ टाकसाळे यांनी केला सस्पेंड!!

परभणी l सहकारी महिला आरोग्य सहाय्यीका सोबत असलेले गैर संबंध, जिल्हा परिषद आणि शासनाची प्रतिमा मलिन केल्या प्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र येलदरी ता जिंतूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ कैलास पवार याला अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी निलंबित केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र कोल्हा ता. मानवत येथे कार्यरत असतांना वैद्यकीय अधिकारी डॉ. व कंत्राटी आरोग्य सहाय्यीका यांचे गैर संबंध असल्या बाबत स्थानिक वर्तमानपत्र आणि गावकऱ्यां मार्फत तक्रारी करण्यात आल्या होत्या. यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. सदर चौकशी दरम्यान डॉ व आरोग्य सहाय्यीका यांचे गैर संबंध असल्याचे दिसून आले.
त्यानुसार डॉ. यांना ताकीद देऊन परत असा प्रकार होऊ नये म्हणून त्यांची तात्पुरत्या स्वरूपात प्राथमिक आरोग्य केंद्र येलदरी ता. जिंतूर येथे बदली करण्यात आली होती.
परंतु तरीही याच्या वर्तणुकीत सुधारणा झालेली दिसून आली नाही. त्यांच्या पत्नीने पतीविरुद्ध पोलिसात दिलेली तक्रार, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील नियम 3 चा भंग करणे, शिस्त व अपील 4 प्रमाणे जिल्हा परिषदेची व सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन केल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी निलंबित केले असून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे त्यांच्यावर कारवाई करण्या बाबत शिफारस केली आहे.

यापुढे जिल्हा परिषद आणि शासनाची प्रतिमा मलिन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
शिवानंद टाकसाळे
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, परभणी

Exit mobile version