Marathwada Sathi

दक्खनची राजधानी अडकली “नावाच्या ” वादात

भाजपच्या राम कदमांची शिवसेनेवर टीका -औरंगाबाद की “संभाजीनगर” यावरून शिवसेना भाजपात वाद

मराठवाडा साथी

औरंगाबाद : औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेनामध्ये सध्या तोडीचे वाद सुरु आहेत.तास हा मुद्दा बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून सुरु झालेला. आता लवकरच औरंगाबाद महापालिका निवडणुकी तोंडावर आल्या आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला जात असतानाच भाजपाने मात्र शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपासोबत सत्तेत असताना हा प्रस्ताव का पाठवला नाहीत अशी विचारणा करत तेव्हा शिवसेनेचे नेते गोट्या खेळत होते का? असा सवाल भाजपा नेते राम कदम यांनी केला.

“औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. भाजपासोबत पाच वर्षे शिवसेना सत्तेत होती. त्यावेळी औरंगाबादच्या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळेस शिवसेनेने औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा हा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे का पाठवला नाही? हा खरा सवाल आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यावर आता शिवसेनेला पुन्हा हा मुद्दा उपस्थित करावासा वाटतोय. काँग्रेस आणि शिवसेना दोघे सत्तेत आहेत. एकाने विरोध करायचा आणि दुसऱ्याने पाठिंबा दाखवायचा असा त्यांचा डाव आहे. शिवसेनेला खरंच नामांतर करायचं होतं तर भाजपासोबत सत्तेत असताना हे लोक काय गोट्या खेळत होते का?”, असा सवाल राम कदम यांनी केला.

त्यामुळे सध्या नामकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Exit mobile version