Home इतर आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक…….

आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक…….

692
0

भंडारा अग्निकांडव : जिल्हा सामान्य रुग्णालयाला राज्यपाल कोश्यारी यांची भेट.

भंडारा : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अग्नितांडवात १० मासूम बालकांचा मृत्यू झाला.या भागाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देत आपली भावना व्यक्त केली. “जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात,” असे निर्देश देतानाच प्रत्येक मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी घोषणा राज्यपाल कोश्यारी यांनी आज येथील सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर केली.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनिल मेंढे, आमदार परिणय फुके, नरेंद्र भोंडेकर, राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव उपस्थित होते.ही पाहणी केल्यानंतर कोश्यारी यांनी या घटनेत मृत पावलेल्या प्रत्येक बालकांच्या कुटुंबियांना स्वेच्छानिधीतून दोन लाख रुपये मदत देण्यासंदर्भात सूचना दिल्या. विविध संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी राज्यपालांना भेटून या घटनेसंदर्भात निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here