Marathwada Sathi

मृत बालकांच्या आईंचा आक्रोश…!

मराठवाडा साथी न्यूज

भंडारा : प्रत्येकाला सुन्न करून ठेवणारी घटना काल(८ जाने.)मध्यरात्री वाजेच्या सुमारास महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाजा आहे.या युनिटमध्ये एकूण १७ नवजात बालके होती,त्यापैकीबालकांना वाचविण्यात यास आले.मात्र,१० बालके स्वास गुदमरून मरण पावली.या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे.

आपले लेकरू आता या जगात नाही,ही माहिती मिळताच रुग्णालय परिसरात बालकांच्या आईंनी आक्रोश केला.रुग्णालयाकडून अजूनही स्पष्ट माहिती दिली जात नसून बालकांना भेटूही दिले जात नाहीये.त्यामुळे पालकांसह मृत बालकांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.झालेली घटना ही रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळेच घडली असे म्हणत बालकांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर आणि संबंधित डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान,रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून मध्यरात्री २ सुमारास अचानक धूर निघत असल्याचे समोर आले.धूर बघताच ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले.तेव्हा रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता,त्यामुळे तिने लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. ज्यानंतर त्वरित अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले.

Exit mobile version