Marathwada Sathi

कोरोनातून बरे झालेल्यांवर या नवीन आजाराचे ‘संकट’…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये आता एका नवीन प्रकारचे धोकादायक फंगल इंफेक्शन आढळून येत आहे.ज्यामुळे काही लोकांची दृष्टी कमकुवत झाली आहे.दिल्ली मधील गंगाराम रुग्णालयामध्ये कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये हे फंगल इंफेक्शन सापडले आहे.मागील १५ दिवसांमध्ये ईएनटी डॉक्टरांना १३ धोकादायक फंगल इंफेक्शन आढळले.त्यातील ५० टक्के लोकांची दृष्टी कमी झाली आहे.

या इंफेक्शनला तज्ज्ञ वैज्ञानिकांनी एक पोस्ट कोविड प्रभाव मानले आहे. या प्रकारच्या इंफेक्शनला ‘म्युकोरमायकोसिस’ आणि ‘झिगॉमायकोसिस’ असे देखील म्हंटले जाते.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्युकोरामायसिसच्या १३ प्रकरणांमध्ये डोळ्यांची दृष्टी कमी होत आहे व त्यातील ५० टक्के लोकांना नाक आणि जबड्याचे हाड काढून टाकावे लागण्याचीही भीती आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्युकोरमायकोसिसमुळे जणांचा मृत्यूही झाला आहे.

‘म्युकोरमायकोसिस’ ची लक्षणे

तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही या इंफेक्शनची लक्षणे आहेत.हा एक असा आजार आहे, ज्याद्वारे श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात आणि वेगवेगळ्या अवयवांचे नुकसान करतात.

Exit mobile version