Home परभणी स्त्रीया जाग्या झाल्या तरच देशाचा विकास होईल-डॉ विजया चव्हाण

स्त्रीया जाग्या झाल्या तरच देशाचा विकास होईल-डॉ विजया चव्हाण

114
0

परभणी : येथे “स्त्री मुक्ती दिनानिमित्त “ आयोजित कार्यक्रमात डॉ. विजया चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले. विश्व्रत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर रोजी मनू स्मृती चे दहन करून संपूर्ण स्त्री जातीला जोखडातुन मुक्त केले, त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी 25डिसेंबर हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करते. त्याचे निमित्त साधून परभणी वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे 29 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता विसावा कॅफे सभाग्रह येथे “स्त्री मुक्ती दिन” साजरा करण्यात आला. अध्यक्ष भाषणात डॉ. विजया चव्हाण म्हणाल्या, “जर लोकांना जागे करायचे असेल तर सर्व महिला वर्गाने जागे झाले पाहिजे, पुरुष-स्त्री हा भेदभाव देशाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागे टाकतो. स्त्री आज पुरुषा बरोबर ठामपणे उभी आहे. त्यामुळे कल ही स्त्री श्रेष्ठ होती व आज ही श्रेष्ठ आहे”.

प्रमुख मार्गदर्शका ऍड. हर्षा सूर्यवंशी ह्यांनी उपस्थित महिला यांना महिला कायद्याविषयी माहिती दिली. डॉ संजीवनी बारहाते यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांची स्त्री विषयक भूमिका या बद्दल विचार मांडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक सौ प्रा. संजिवनी बारहाते , ऍड . हर्षा सूर्यवंशी कार्याक्रमच्या अध्यक्ष डॉ विजया चव्हाण, राज्य सचिव वंचित बहुजन महिला आघाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ धर्मराज चव्हाण,विभागीय प्रवक्ता,विभागीय प्रशिक्षक डॉ सुरेश शेळके, संपत नंद, सुभाष सोनवणे, अरुण गिरी, बी. आर आव्हाड.अशोक चांद्रमोरे, वाघमारे साहेब,ये स. कांबळे अशोक वाव्हळ, अशोक कांबळे, सोनकांबळे, गोदाम उपस्थित होते.

स्त्रियांसाठी १० ठराव मंजूर :
महापुरुष्याच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. या परिषदेमध्ये स्त्रीयाच्या बाबतीचे 10 ठराव मांडण्यात आले व ते आवाजी मताने मंजूरही करण्यात आले.

कार्यक्रमच्या संयोजक सुनीता साळवे, ऍड. प्रतिमा चंद्रमोरे, कुसुम ताई कानकुटे , माला साळवे, विमल उगले, मंगला गायकवाड, गंगासागर पाटील, सविता सोनटक्के, अर्चना शीतळे, निकिता इंगळे, साक्षी कांबळे, खिलारे ताई यांनी कार्यक्रमासाठी कष्ट घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here