Home अहमदनगर कोरोना संकट अजून आठ महिने राहणार – बिरोबाचे होईकात यांचे भाकीत

कोरोना संकट अजून आठ महिने राहणार – बिरोबाचे होईकात यांचे भाकीत

57
0

मराठवाडा साथी न्यूज
अहमदनगर :
देशात कोरोना महामारीचे संकट अजून आठ महिने राहणार आहे, देशात मोठी चळवळ होणार आहे, युध्दाचीही शक्यता आहे, असे भाकीत नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील होईकात यांनी वर्तवले आहे. शेतीला व लक्ष्मीला पिडा नसल्याचे होईकात यांनी सांगितल्याने भविष्य ऐकण्यासाठी जमलेल्या उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.


नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे होईकात यांचा धार्मिक कार्यक्रम रविवारी,1 नोव्हेंबर रोजी पार पडला. मागील वर्षी सांगितलेले रोगराईचे भाकीत खरे ठरले होते. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईकात (भविष्यवाणी) सांगताना पुढील वर्षी येणाऱ्या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. देवाचे भगत भुसारे यांनी अंगावर वेताचे फटके ओढून भविष्यवाणी (होईक) सांगितले. ते म्हणाले की, दाही खंडामध्ये रक्ताचा पूर वाहणार म्हणजे युध्द होणार, लक्ष्मीला पिडा नसून, बाळाला संकट आहे. आभाळ फिरेल व ज्वारीच्या पिकाला अपकार होईल, दिवाळीच्या दिव्याने पाच ते सात दिवस आभाळ येऊन काही ठिकाणी पाऊस पडेल, कपाशीला 7 ते 9 हजार क्विंटल, सोन्याला 40 ते 54 हजार रु. (तोळा), ज्वारी 2500 ते 2700 रु. पर्यंतचा पुढील वर्षासाठी भाव वर्तवला. तसेच गहू, हरभऱ्यावर तांबारा रोग पडेल व गहू, हरभराचे भाव वाढणार असल्याचे सांगितले. तर सात ते अकरा दिवस आभाळ फिरुन पाऊस होईल. पुढील आषाढी कठीण जाईल व मुगराळ्याची पेर होऊन घडामोड होईल. ज्वारी, गहू व हरभऱ्याची पेर होऊन काही हसतील तर काही रडतील, असे भाकीत होईकात यांनी सांगितले होते, अशी माहिती नाना डोंगरे यांनी दिली. बिरोबा यात्रेत यावर्षी देखील पशु हत्या बंदीचे पालन करुन देवाला भाजी-भाकरीचा नैवद्य दाखविण्यात आला. भविष्यवाणी ऐकण्यासाठी नगर शहर, निमगांव वाघा, चास, पिंपळगाव वाघा, जखणगांव, हिंगणगाव, नेप्ती, हिवरे बाजार, निंबळक, इसळक, खारेकर्जुने आदी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. गावातील भविष्यवाणी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डोंगरे यांच्यासह बाबा जाधव, गोकुळ जाधव, अंशाबापू शिंदे, बाबा पुंड, बबन कापसे, संजय डोंगरे, रावसाहेब भुसारे, बशीर शेख आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here