Marathwada Sathi

घोड्यांचा रथ ,लोकांचा उत्साह थाटाबाटात झाले नटराजनचे स्वागत

तामिळनाडू : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी हरवून ऐतिहासिक विजय प्राप्त केला. या विजयासह भारताने इतिहासात विक्रम रचून ठेवला. यानंतर भारतीय संघाचे भारतात आल्यावर जंगी स्वागत करण्यात आले. तामिळनाडूमधील सलेम जिल्ह्यातील चिन्नपमपट्टी गावात भारताचा नटराजन गुरुवारी त्याच्या घरी पोहचला. नटराजन याचं त्याच्या गावात जल्लोषात स्वागत झालं. इथं त्याच्यासाठी चक्क घोड्याचा रथ आणला होता. या बग्गीवर त्याला मिरवत-मिरवत घरी नेहण्यात आलं. यासगळ्या मिरवणुकीत त्याला शेकडो चाहत्यांनी घेरलेलं होतं.ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नटराजन यानं भारतीय संघाकडून एकदिसीय, टी-२० आणि कसोटी सामन्यात पदार्पण केलं. नटराजन यानं पदार्पणात सुरेख कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली.

नटराजनच्या स्वगाताचा व्हिडीओ भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागन यानं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. विरेंद्र सेहवागनं व्हिडीओ शेअर करताना म्हटले की, ‘स्‍वागत नहीं करोगे.. हा भारत आहे… आि इथं क्रिकेट फक्त खेळ नाही. त्याहून खूप काही आहे. नटराजन सलेम जिल्ह्यातील चिन्नपमपट्टी गावी पोहचला तेव्हा त्याचं असं जंगी स्वागत करण्यात आलं. काय कमाल कथा आहे!’

Exit mobile version