Marathwada Sathi

मांजाने कापला अधिकाऱ्याचा गळा…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सरकारीने बंदी आणल्यानंतरही नायलॉन मांजाची विक्री राज्यात सुरुच आहे.या मांजामुळे दुर्घटना घडल्याच्या घटना नाशिक आणि नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी उघड झाल्या होत्या.आता राजधानी मुंबईमध्येही अशीच धक्कादायक घटना घडली आहे.मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुंबईच्या वरळी पोलीस स्टेशनचे साहय्यक पोलीस निरीक्षक राकेश गवळी यांचा गळा नायलॉन मांजामुळे चिरला.शनिवारी दुचाकीवरुन जातांना जे.जे. मार्गाजवळील जंक्शनजवळ ही दुर्घटना घडली असून गवळी थोडक्यात बचावले.गवळी यांच्या गळ्याचं ऑपरेशन करण्यात आले असता त्यांच्या गळ्याला १० टाके देण्यात आले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने १९८६ पर्यावरण संरक्षण कायदा कलम नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे.असे असून सुद्धा बाजारपेठेत नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे.

Exit mobile version