Marathwada Sathi

वडवणी ते साळींबा रोडवरील पुल बनला म्रुत्यु चा सापळा

वडवणी : वडवणी तालुक्यातील 25 गावाचा दळणवळणाचा प्रमुख मार्ग असणाऱ्या वडवणी ते साळींबा, कवडगाव रोडवरील कान्हापुर,मामला तलावावर असणाऱ्या अरूंद पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पुलावर दोन्ही बाजूंनी गुडघ्या इतके खड्डे पडलेले असुन संरक्षणासाठी असणारे लोखंडी कठडे ही गायप झालेले आहेत त्यामुळे हा पुल कोणत्याही क्षणी ढासळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन नवीन पुल करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
वडवणी, बीड,गेवराई, यासह जालना व इतर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख मार्ग म्हणजे वडवणी ते साळींबा, कवडगाव हा रोड आहे तरी या रोडवरून दररोज शेकडो वाहने, उसाचे ट्रँक्टर यासह दुचाकी वाहने ये-जा करतात तरी हा रोडवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते तरी या रोडवरील वडवणी पासून दोन कि.मी.अंतरावर असणाऱ्या कान्हापुर, मामला तलावावर अरूंद व कमी उंचीचा पुल हा गेल्या अनेक दशक वर्षाचा जुना असुन या पुलाची उंची, लांबी व रूंदी ही कमी आहे याची निर्मिती करून अनेक दशक वर्षे झालेले आहेत तरी या पुलाची अत्यंत दुरावस्था झालेली असुन या पुलावर दोन्ही बाजूंनी गुडघ्या इतके खड्डे पडलेले त्यामुळे पुलात खड्डे कि खड्ड्यात पुल अशी अवस्था झाली आहे तसेच संरक्षणासाठी असणारे लोखंडी पाईपचे कठडे हि गायप झालेले आहेत तसेच हा पुल वळणावर व तलावावर असल्याने अत्यंत धोकादायक बनला आहे याठिकाणी वाहनाचा अपघात होऊन अनेक जण पडुन गंभीर जखमी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत तरी सध्या साखर कारखाने सुरू झालेले असून हा भाग उस उत्पादक म्हणून ओळखला जातो तरी शेकडो उसाचे वाहने हि या पुलावरून दररोज ये-जा करतात तरी हा जुना पुल कधीही कोणत्याही क्षणी ढासळु शकतो अशी अवस्था झाली आहे यातून मोठी दुर्घटना ही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी हा पुल म्रुत्युचा सापळा बनला आहे तरी हा पुल नवीन करण्यात यावा किंवा तात्काळ दुरुस्ती करून खड्डे बुजविण्यात यावेत ,संरक्षण कठडे बसविण्यात यावेत नसता लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा, साळींबा, मामला, पिंपरखेड, देवडी, मोरेवाडी,कवडगाव, खळवट लिंमगाव, देवगाव, काडीवडगाव, खापरवाडी,लवुळ क्र.2 यासह इतर गावच्या ग्रामस्थांनी चालू आहे.

Exit mobile version