Home गंगाखेड खळी येथील गोदावरी पाञात अज्ञात तरूणाचा मृतदेह

खळी येथील गोदावरी पाञात अज्ञात तरूणाचा मृतदेह

76
0

मराठवाडा साथी न्यूज

गंगाखेड : गंगाखेड-परभणी रोड वरील खळी येथील गोदावरी पुल दुसलगाव परीसर गोदावरी पाञात अज्ञात तरुणाचा मृतदेह पाण्यात तरगंता आढळून आला आसता दुसलगाव येथील बचाव पथकाने यास पाण्यातुन बाहेर काढले.
गंगाखेड-परभणी रोड वरील खळी पुल येथील गोदावरी पुल दुसलगाव परिसर गोदावरी पाञात आज दि.१८ रोजी दुपारी दुपारचा दरम्यान अज्ञात तरूण वय ३५ याचा मृतदेह पुलाच्या मधोमध खोल पाण्यात तरगंत आसताना पोलिस पाटिल सौ.संगीता कचरे यांना दिसुन आला आसता या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात दिली आसता घटना स्थळी पोलिसानी धाव घेतली आसता सदरील तरूण खोल पाण्यात आसल्याने गोदावरी पुलावरून या तरूणाचे पाण्यात अर्धवट डोके दिसत होते.पोलीस पाटील सौ.संगीता कचरे यांच्या बचाव पथकातील त्रिंबक नामदेव कचरे यांनी या तरूणाचा मृत देह पण्यातुन बाहेर काढण्यास मदत केली.सदरील तरूणाची ओळख पटलेली नसुन पोलिसानी घटनास्थळी पंचनामा करण्यात आला यावेळी बिट जमादार शिंदे साहेब,पडोळे साहेब,पो.पाटील सौ.संगिता कचरे कृष्णा बिजले,नवनाथ कचरे आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here