Marathwada Sathi

जन्मदात्या आईनेच घेतला ‘जीव’…!

मराठवाडा साथी न्यूज

सोलापूर : ज्या आईने जन्म दिला त्या आईनेच पोटच्या मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मध्ये घडली आहे.मुक्ताबाई जाधव(वय ४५) यांचे तात्या कदम(वय ३५)यांच्याशी अनैतिक संबंध होते.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुक्ताबाई आणि तात्या यांच्या संबंधांना मुक्ताबाई यांचा मुलगा सिद्धेश्वर चा विरोध होता. त्यामुळे शुक्रवारी सिद्धेश्वर झोपेत असतांनाच मुक्ताबाईने आपल्या प्रियकराबरोबर(तात्या)मिळून स्वतःच्या मुलाच्या डोक्यात दगड घालून खून केला आणि त्याचा मृतदेह जवळच्याच शेतात टाकला.काही ग्रामस्थांना शेतात मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांकडे धाव घेतली.दरम्यान,पोलिसांनी मुक्ताबाई यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version