Marathwada Sathi

मधमाश्यांचा विमानाला घोळका ,प्रवाशांना मनस्ताप

नवी दिल्ली : विस्तारा एअरलाइनच्या दोन विमानांवर हजारो मधमाशांनी हल्ला केला.या हल्ल्यामुळे तासभर वाहनाला विमानतळावरच थांबून राहावे लागले. एक विमानाच्या खिडकीला तर दुसऱ्या विमानावर या मधमाशांनी कब्जा केल्याचं या व्हिडीओ आणि फोटोमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे विमानतळावर मोठी खळबळ उडाली होती.ही धक्कादायक घटना कोलकाता विमानतळावर घडल्याची माहिती मिळाली आहे.

सोशल मीडियावर या व्हिडीओला आतापर्यंत 28 हजारहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. या मधमाशांना हटवण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाण्याचा फवारा मारावा लागला. मधमाशांना हटवण्यासाठी साधारण 1 तासाचा वेळ गेला.सऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा विस्ताराच्या ग्राउंड स्टाफचे कर्मचारी उड्डाण करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा मधमाशांनी केलेला हल्ला दिसला. हे विमान पोर्ट ब्लेअरला जाणार होते. पुन्हा मधमाश्या काढण्यासाठी पाण्याच्या जेटची मदत घेण्यात आली, त्यानंतर साडेदहा वाजता विमानाचे उड्डाण करण्यात आलं. अनेक युझर्सनी यावर भन्नट कमेंट्स केल्या आहेत. मधमाशांना देखील लांबचा प्रवास करायचा असेल असं एक युझरनं म्हटलं आहे.

Exit mobile version