Marathwada Sathi

सिगारेट पिण्याचे वय १८ वरून होणार २१ वर्ष …!

मराठवाडा साथी न्यूज

नाशिक : सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिण्यास बंदी असतांनाही कॉलेजेस बाहेर किंवा चहाच्या ठेल्यावर ठिकठिकाणी सिगारेटचा धुर सोडणारे आपल्याला दिसून येतात.विशेष म्हणजे यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश असतो. त्यामुळे सिगारेट पिण्याचे वय आता १८ वरून २१ करण्यात यावे यासाठीचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाने सरकारकडे दिला आहे.फक्त एव्हढेच नाही तर सुट्टी सिगारेट विक्रीवरही बंदी घालण्यात येणार आहे.

‘कायद्यानूसार सिगारेट पिण्यासाठी १८ वर्षाची वयोमर्यादा आता २१ वर्ष करण्यात येणार आहे. तसेच तंबाखूजन्य असे कुठलेही पदार्थ २१ वर्षाखालील कोणालाच आणि कुठल्याही मार्गे पोहोचणार नाही यासोबतच सुट्टी सिगारेट विक्रीवरही बंदी घालण्याची शिफारस केली गेली आहे.तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास होणारी कारवाई अधिक कठोर केली जाणार आहे.विशेष धक्कदायक ज्या व्यक्तीला सिगारेटचे व्यसन असते. अशा व्यक्तीला कोरोना झाल्यास ती व्यक्ती चांगली होण्यासही वेळ लागत असल्याचे डॉक्टर सांगतात’असे आरोग्य विभागाने सादर केलेल्या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version