Marathwada Sathi

या अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटीज चे अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.फराह खान,ईशा देओल,विक्रांत मेस्सी यांच्या मागोमाग याचाच फटका आता अभिनेत्री तब्बू हिलाही बसला आहे.

दरम्यान,तब्बूने मेसेज शेअर करत चाहत्यांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे.तिने लिहिले आहे की,’हॅक अलर्ट…माझे अकाऊंट हॅक झाले आहे. कृपया माझ्या अकाऊंटवरील कोणतीही लिंक क्लिक करु नका.’ इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिने हा मेसेज शेअर केला.

महत्वाचे म्हणजे फक्त सेलिब्रिटीच नाही,तर त्यांच्या मुलांच्या देखील सोशल मीडिया अकाऊंटवर हॅकर्सची नजर आहे.काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आपली मुलगी रेनेचे अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली होती.

Exit mobile version