Marathwada Sathi

व्हिसाशिवायच दुबईला पोहोचला हा अभिनेता…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : दुबईला एक बॉलीवूड अभिनेता गेला. मात्र,तिथे पोहोचल्यावर आपल्याकडे व्हिसाची मुळ प्रत नसल्याचे त्याच्या लक्षात आले.दुबईमध्ये जाऊन आपल्याकडून एक मोठी चूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.हा अभिनेता दुसरा कोणी नाही तर विवेक ओबेरॉय आहे.स्वतः विवेकनेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली. त्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले.

दरम्यान,सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती देत असतांना विवेक म्हणाला की,’मी इथे या सुरेख अशा ठिकाणी, दुबईमध्ये आहे.काही कामासाठी मी इथे आलो आहे. पण, माझ्यासोबत एक अनपेक्षित घटना घडली. त्यामुळे तुम्हालाही त्याची माहिती द्यावी असे मला वाटले.मी दुबईमध्ये आलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की आपल्याकडे व्हिसाची मूळ प्रत नाही. म्हणजे व्हिसा आहे पण,त्याची प्रत मी सोबत आणली नाही. फोनवरही त्याची डिजिटल कॉपी नाही.’

https://www.instagram.com/tv/CJ6SXDqFbE-/?utm_source=ig_web_copy_link

Exit mobile version