Home मनोरंजन ठाण्याची श्रुतिका बनली ‘मिस इंडिया ऑस्ट्रलिया’…!

ठाण्याची श्रुतिका बनली ‘मिस इंडिया ऑस्ट्रलिया’…!

235
0

मराठवाडा साथी न्यूज

ठाणे : ऑस्ट्रेलियामध्ये राहत असलेल्या भारतीय तरूणींसाठी प्रत्येकवर्षी ‘मिस इंडिया स्पर्धे’चे आयोजन करण्यात येते.कोरोनोच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची ऑनलाईन ऑडिशन व मुलाखत घेण्यात आली होती.दरम्यान,यंदा या स्पर्धेत ठाण्यातील प्रसिध्द डॉक्टर संदीप माने यांची कन्या श्रुतिका माने(वय २०)ने ‘मिस इंडिया सौंदर्य स्पर्धे’त विजेतेपद पटकावले आहे. श्रुतिका मूळची ठाण्यातील असून सध्या ती ऑस्ट्रेलिया येथील एडलेड विद्यापीठातून ‘अॅडव्हान्स हेल्थ अँन्ड मेडिकल सायन्स’चे पदवी शिक्षण घेत आहे.

माध्यमांशी बोलतांना श्रुतिका म्हणाली की,‘मिस इंडिया ऑस्ट्रेलिया’साठी माझी निवड झाली, ही माझ्या दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. हा मुकुट म्हणजे एक जबाबदारी आहे, ज्याची जाणीव मला आहे. भविष्यात आणखी काय करता येईल, याची उत्सुकता मला लागली आहे. महाराष्ट्रातील बंधू भगिनींचा पाठींबा मिळाला, त्यामुळे हे यश मी मिळवू शकले. जागतिक स्तरावर भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करणे, त्यांच्यातील सामर्थ्य व कलागुण जगासमोर आणणे, हा या स्पर्धेत भाग घेण्याचा उद्देश होता’, असे श्रुतिकाने सांगितले.

दरम्यान,मुंबईत(ऑक्टो. २०२१)होणाऱ्या ‘मिस इंडिया’ जागतिक स्पर्धेसाठी श्रुतिका ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधीत्व करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here