Marathwada Sathi

आयआरबीच्या गलथान कारभारामुळेच ‘त्या’ दुचाकीस्वाराचा मृत्यू

बीड

मृत पावलेल्या तरुणाच्या नातेवाईकांचा आरोप
पंचर ट्रॅक्टर ट्रॉलीला तब्बल सहा महिने धडकले

रात्री गेवराई तालुक्यातील रांजणी फाट्यावर एका पंक्चर झालेल्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची धडक झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र पंक्चर झालेल्या ट्रॅक्टरला आयआरबीच्या कर्मचार्‍यांनी वेळेवर रस्त्याच्या कडेला घेतले नाही. आयआरबीकडून त्या अपघातस्थळी एकही कर्मचारी पाठविण्यात आला नाही त्यामुळेच उभ्या ट्रकला रात्री पाच वाहने जावून धडकले. यामध्ये त्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
पोखरा संदर्भात काल बीडमध्ये बैठक घेण्यात आली होती. या बैठकीचे रात्री उशीरा कामकाज आटोपून अतुल कदम (वय २८, रा. गोविंदवाडी ता. गेवराई) हा तरुण आपल्या गावी दुचाकीवरून जात असताना रांजणी फाट्यावर उभ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतरही उभ्या ट्रॅक्टरला तीन वाहने धडकली. तरी देखील आयआरबीच्या कर्मचार्‍यांनी अपघातस्थळी येऊन ट्रॅक्टर साईडला घेतला नाही.
जर वेळीच आयआरबीच्या कर्मचार्‍यांनी ट्रॅक्टरला बॅरिकेट लावले असते व तो रस्त्याच्या कडेला घेऊन रस्ता रिकामा करून दिला असता तर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला नसता असा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. प्रत्येक वाहनधारक आयआरबीला टोल भरतो त्यामुळे या महामार्गावर कुठे अपघात झाला तर आयआरबीच्या वतीने तात्काळ रस्ता मोकळा करून दिला जातो. मात्र कालच्या अपघातात दोन तास रस्ता रिकामा न झाल्यानेच त्या ठिकाणी पाच वाहने त्या ट्रॅक्टरला धडकली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणाचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.

Exit mobile version