Marathwada Sathi

बुर्ज खलिफावर झळकला ‘वंडर वूमन’ चा ‘टीझर’…!

मराठवाडा साथी न्यूज

‘वंडर वूमन १९८४’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता बघायला मिळत आहे.दरम्यान,इस्रायली सुपरस्टार ‘गल गॅडोट’ हिने सोशल मीडियावर एक अफलातून व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये तिच्या आगामी चित्रपटाची झलक पाहायला मिळत आहे.मुख्य म्हणजे तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दुबईतील जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा या इमारतीवर ‘वंडर वूमन १९४८’ची झलक पाहायला मिळत आहे.’हे अविश्वसनीय आहे’अशा शब्दांमध्ये गलने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली उत्सुकता व्यक्त केली आहे.यावर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने ‘वंडर वूमेन १९८४’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारतामध्ये हा चित्रपट नाताळ सणाच्या एक दिवस अगोदर(२४ डिसें.) प्रदर्शित होणार आहे.

https://www.instagram.com/p/CI1neQ_BZxR/?utm_source=ig_web_copy_link

Exit mobile version